- फुगेवाडीतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची शासनाकडे मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- दापोडीतील फुगेवाडी परिसरात विषारी गावठी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार Shrirang Barne यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र युनिट स्थापन करून शहरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासदार बारणे यांनी दापोडी पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
“हडपसर परिसरातून तयार होणारी गावठी दारू विविध भागांत विकली जात होती. त्यामध्ये केमिकलचे प्रमाण अधिक झाल्याने ती विषारी ठरली,” असे बारणे म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे.















