न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (दि. २५) आयोजित दिवाळी फराळ सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्नेहपरंपरेत यंदा महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार सहभागी झाले.
समाजातील विविध घटकांशी पत्रकारांचे स्नेहबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यापूर्वी स्वच्छता कर्मचारी, शिपाई आणि सुरक्षा रक्षकांसोबत फराळ आयोजित करण्यात आला होता. यंदा वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, अनंत कोऱ्हाळे, मनोज सेठिया, उल्हास जगताप, सुनील पवार, विजय भोजने, काशीद, लक्ष्मीकांत कोल्हे, बाळासाहेब लांडे, प्रमोद बोरसे, शशिकांत मोरे, सोहम निकम, डी. डी. पाटील, सूर्यकांत मोहिते, बापू गायकवाड, विनय ओव्हाळ, अनिल भालसाखळे, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, सत्यवान उबाळे, प्रमोद भोसले उपस्थित होते.
अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील कांबळे, विनय लोंढे, रेहान सय्यद, सचिव संतोष जराड, मुकेश जाधव, युनूस खतीब, जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, अमोल डंबाळे आणि सबनम सय्यद यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















