न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावर आधारीत समाजप्रबोधन पर्व कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन गुरूवार दि.१३/०६/१९ रोजी कै. मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्ष्यस्थानी महापौर राहुल जाधव होते. गतवर्षीप्रमाने छत्रपती शाहू महाराज समाजप्रबोधन पर्व मोठया उत्साहात साजरे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
यावेळी नगरसदस्या मंगला कदम, अनुराधा गोरखे, नगरसदस्य तुषार हिंगे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, मुख्यलिपिक रमेश भोसले, प्रफुल्ल पुराणिक, कृष्णा पाटील, नामदेव शिंत्रे, संजय गावडे, अनिल पाटील, अमर एकशिंगे, राहुल भोरबाळे, विक्रमसिंह पाटील, रविंद्र पाटील, दैवत पाटील, मनोज तेली, सचिन साठे, दिगंबर बलुगडे, मनोहर चौगले, बाजीराव गायकवाड, सुनील पाटील, पांडुरंग पाटील, अक्षय पाटील, विजय नाळे, संजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.















