न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- चऱ्होली जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करून त्याला मृत समजून निर्जन ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना चऱ्होली परिसरात घडली. या प्रकरणी दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी वसीम हुसेन शेख (वय ३३, रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी रात्री साडेअकरा ते पहाटे दीडच्या दरम्यान राहुल गार्डनसमोर, काटेवस्ती-चऱ्होली येथे प्रेम जाधव, करण सोळंके, माऊली निरस, सोन्या जाधव, खंडू लोणकर आणि इतर अनोळखी साथीदारांनी फिर्यादीवर कोयत्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या हात, गुडघा, डोके आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यानंतर आरोपींनी वसीम शेख यांना गाडीत टाकून विश्रांतवाडी-वडगाव रोडलगतच्या मोकळ्या जागेत नेले आणि मृत समजून तेथे सोडून पळ काढला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करत आहेत.















