- कामगाराचा मृत्यू, तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा साधनांची व्यवस्था न करता कामगारांना धोकादायक पद्धतीने काम करण्यास भाग पाडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना किवळे येथे घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
अजमत नजरुल खान (वय २२, रा. पुनावळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सीएमएस स्कूल, किवळे येथील बांधकाम साईटवर सेफ्टी नेटचे काम सुरू होते. मात्र कामगारांना सेफ्टी शूज, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, दोरी किंवा शिडी यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.
काम सुरू असताना सनी शेख याचा तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. डोके व मानेस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल महतो, सय्यद रफिकुल अली, सागर सावंत व प्रशांत खोजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुगावकर करीत आहेत.















