- भाजयुमोचा ‘निरोगी युवा – सशक्त भारत’ संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २१ जून २०२६ :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरातील १४ ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
यमनानगर-तळवडे, आकुर्डी-शाहूनगर, भोसरी-कृष्णानगर, संत तुकाराम नगर, वाकड-थेरगाव, रहाटणी-पिंपळे सौदागर, दिघी-भोसरी, चिंचवड-काळेवाडी, चिंचवड प्राधिकरण, मोशी-चऱ्होली, इंद्रायणीनगर-नेहरूनगर, पिंपरी-फुगेवाडी-बोपखेल, सांगवी-पिंपळे गुरव आणि रावेत-वाल्हेकरवाडी येथे एकाच वेळी योग दिन कार्यक्रम पार पडले.
या उपक्रमात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत प्रत्येकाने योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे आवाहन केले. ‘निरोगी युवा – सशक्त भारत’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम आरोग्यविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.














