न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने आज शनिवार (दि. १५ जून) रोजी विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभेत नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावरील त्या खोट्या गुन्ह्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध केला.
चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकाने त्याच्या टपरीवर कारवाई करायला लावल्याच्या रागातून, सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलीसांत खोटी तक्रार दाखल केली होती. त्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध केला. तसेच अशा कृत्यांना आळा बसावा यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी महापौर जाधव यांच्याकडे नगरसेवकांनी केली.
शहरातील पदपथांवरील अतिक्रमण, अनधिकृत टपरी-पथारीधारक यांच्यामुळे होणाऱ्या रस्त्यावरील रहदारीला अडथळा, तसेच अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा मुद्दाही सभागृहात नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर जाधव यांनी आयुक्त हर्डीकर यांना केल्या.

















