न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री भाजपचे नेते प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने शनिवार (दि. १५) रोजी पिंपरी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘प्रकाश मेहता राजीनामा द्या, पुरे शहर मी बजाओ डंका, भ्रष्टाचार कि जलाओ लंका, जनता कि है ललकार, बंद करो भ्रष्टचार’, अशा घोषणा देण्यात आल्या.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड पालिकेतील भ्रष्टचाराबाबत सत्तधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला व शहरातील भ्रष्टाचारबाबत मोठे जनआंदोलन उभे करण्याची सूचना केली.
तसेच संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, प्रकाश मेहता, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे ,संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देसाई, गिरीश बापट यांसारख्या अर्ध्या डझन पेक्षा जास्त मंत्र्यांवर विविध प्रकरणामध्ये भ्रष्टचाराचे आरोप झाले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायालय असल्यासारखे सर्वाना क्लीन चिट दिली. त्यामुळॆ भाजप व मुख्यमंत्री कितीजरी पारदर्शकतेचा आव आणत असले तरी, त्यांना पारदर्शक कारभार करता आला नाही, उलट भ्रष्टचारी मंत्र्यांना त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत कि, “क्लीनचिट” मंत्री असा प्रश्न जनता विचारत आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी अपना वतन संघटनेचे राजश्री शिरवळकर, हेमलता परमार, निर्मला डांगे, आरती कोळी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या नेत्या अनिता साळवे, ओबीसी संघर्ष समितीचे अनंदा कुदळे ,राजू शेरे, हमीद शेख, अब्दुल शेख, दिलीप देहाडे, संतोष कदम, ऍड मोहन अडसूळ, गिरीश वाघमारे, आपचे यशवंत कांबळे, सुजय शेठ, प्रकाश पठारे, सतीश काळे, फारुख शेख, शाहरुख खान, भारत मिरपागरे, फ्रान्सिस गजभिव, डेव्हिड काळे, डॅनियल सोनकर, शकील सय्यद, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण पांचाळ, तौफिक पठाण, विशाल निर्मल, दिवेश पिंगळे, चांद सय्यद , मायकल नाडर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.















