- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे उपस्थित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रायगड (दि. २७ जून २०२६) :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महापौर रवि लांडगे यांनी यावेळी ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा प्रेरणादायी आदर्श आहे. रायगड ही प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणास्थळी असून, येथे येऊन शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्याचे भाग्य लाभणे ही अभिमानाची बाब आहे. शिवरायांनी दिलेला शौर्य, पराक्रम, न्याय आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.















