न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- चिंचवड येथील विद्यानगर परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जून २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान देवता प्रोव्हिजन स्टोअर्सजवळ, आयशा मशिदीच्या पाठीमागे, विद्यानगर, चिंचवड येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी मयत महिलेच्या मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, नागनाथ दत्तु कांबळे (वय ४५, व्यवसाय – चालक, रा. विद्यानगर, चिंचवड) याने पत्नी वैशाली नागनाथ कांबळे (वय ३५) हिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालत तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















