न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार बाळा भेगडे यांना मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. आमदार भेगडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भेगडे हे पुणे जिल्ह्यातील भाजपचे एकमेव भाजप मंत्री असणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवार (दि. १६) रोजी झाला. या विस्तारात पूर्वी पुणे जिल्ह्यातून मंत्री असणारे गिरीश बापट हे लोकसभेत विजयी झाले आहेत. तर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे बाळा भेगडे हे जिल्ह्यातील एकमेव भाजप मंत्री आहेत.
१३ जणांमध्ये ८ जण कॅबिनेट मंत्री असतील, तर ५ जण राज्यमंत्री असतील. पाहूया कुणाला कोणत्या दर्जाचं मंत्रिपदं दिले आहे :-
कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – कॅबिनेट मंत्री
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री
आशिष शेलार (भाजप) – कॅबिनेट मंत्री
संजय कुटे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
सुरेश खाडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
अनिल बोंडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
तानाजी सावंत (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री
अशोक उईके (भाजप) – कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
योगेश सागर (भाजप) – राज्यमंत्री
अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट) – राज्यमंत्री
संजय (बाळा) भेगडे (भाजप) – राज्यमंत्री
परिणय रमेश फुके (भाजप) – राज्यमंत्री
अतुल सावे – भाजप