न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. पिंपळे गुरव येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वडाच्या झाडाचे पूजन करून आणि त्याला सुती धागा बांधून सात फेऱ्या मारत पुरुषांनी स्त्री समानतेचा संदेश दिला.
स्त्री आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात सोबतीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी सोबत असल्याने महिलांनीच का प्रत्येक जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून पूजन करावे तर, पुरुषांनीही यासाठी वडाच्या झाडाचे पूजन केले तर ती खरी समानता होईल. नेमकी ही भावना समोर ठेवून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेतर्फे पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. स्त्री समानता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे. या भावनेने पुरुषही स्रियांसोबत आहेत. हा आगळ्या-वेगळ्या पूजनामागील उद्देश असल्याचे संघटनेचे अण्णा जोगदंड यांनी या वेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, सचिव ,गजानन ,धाराशिव कर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा ,संगिता जोगदंड,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, अरूण पवार, प्रविण गायकवाड, युवक सचिव , अक्षय जगदाळे, हेमंत नेमाडे आळंदी शहर सचिव रवि भेंनकी, आप्पाजी चव्हाण ,प्रकाश बंडे्वार ,हनुमंत पंडित, वसंतराव चकटे , पंडित वनसकर, वामन भरगंडे, सुर्यकांत कुरुंदकर, राजेंद्र गोराने, मुरलीधर दळवी, ईश्वर सोनोने, सचिन सागवे, बदाम कांबळे, विनायक बिराजदार, प्रदिप बोरसे,रविंद्र सुरवे आदी उपस्थित होते.















