न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०६ पिंपरी (अजा) विधानसभा मतदारसंघात ३० जून २०२६ पासून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलैदरम्यान ३९८ बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन गणना प्रपत्र (EF) वाटप व स्वीकारणार आहेत. या मोहिमेसाठी २३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ४० नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी, पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारसंघात ३९८ मतदान केंद्रे असून ४,०१,९७५ मतदार नोंदणीकृत आहेत. ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी केले आहे.
















