- सोमाटणे येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. ०५ जुलै २०२६) :- सोमाटणे येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव टेम्पोने दोन दुचाकींना धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू, तर एका युवतीला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात टेम्पो चालक भिमा अर्जुन सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी दिप हितेन नागदा हे मैत्रीण पूजा पटेल हिच्यासह स्कूटरवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या टेम्पोने प्रथम प्रतिक कुलकर्णी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रतिक कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर धडक बसलेल्या दुचाकीने फिर्यादींच्या स्कूटरला धडक दिल्याने पूजा पटेल गंभीर जखमी झाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
















