- पवना धरणातील जलसाठा वाढला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- पवना धरणातील जलसाठ्यात मुसळधार पावसामुळे लक्षणीय वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लागू असलेली १५ टक्के पाणीकपात तातडीने रद्द करून पूर्ववत पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे पाणीकपात आवश्यक होती, मात्र गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे पवना धरणातील पाणीसाठा समाधानकारक वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील अनेक भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाणीकपात मागे घेऊन सर्व नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

















