न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ७ जुलै २०२६) :- चिखली परिसरातील ब्लू डायमंड सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळे कंपाउंड भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. भिंत पार्किंगवर पडल्याने शेड कोसळले आणि अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक संरचनांची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

















