न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- महामेट्रो प्रकल्पातील चिंचवडच्या मदर टेरेसा उडाणपुल ते रेंजहिल्स डेपोपर्यंत ‘रिच वन’ च्या लोहमार्गाचे काम दिल्लीतील अपूर्वा कृती इन्फ्रा लिमिटेड कंपनी करणार आहे या कामांची मुदत १८ महिने आहे.
ये-जा करणा-या मेट्रोच्या एक किलोमीटर अंतराचा समांतर लोहमार्ग २५ ते ३० दिवसांत तयार करण्याचा कंपनीचा हातखंडा आहे, असे महामेट्रोच्या अधिका -यांनी सांगितले. ‘रिच वन’ मध्ये १२.५० किलोमीटर अंतर आहे. पिपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणी संरक्षण विभाग असे ४ विविध खात्याच्या जमिनी महामेट्रोला प्राप्त झाल्या असून, त्यावर मेट्रो मार्गिकचे काम सुरू आहे.
मात्र, संरक्षण विभाग व खड़की बोर्डाने नुकतीच खडकी व रेजहिल्समधील जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे तेथे नुकतेच काम सुरु झाले आहे. सध्या फुगेवाडी ते खराळवाडी या मागावर ३ वेगवेगळ्या टप्प्यात मेट्रोचा एकूण ३.५० किलोमीटर अंतराचा व्हायाडक्ट तयार झाला आहे.















