न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आणि खासगी शाळांतील पाचवी, दहावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बस प्रवास सवलत पाससाठी अर्जाच वाटप सुरू करण्यात आले आहे.
पासचे वितरण सोमवार (दि. १७) पासून केले जाणार आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केले आहे. या योजनेमुळे पालिकेवर सन २०१९ – २० या आर्थिक वर्षात तब्बल ३ कोटी २० लाख रूपयांचा भार पडणार आहे. पाससाठी अर्जाचे वाटप १० जूनपासून सुरू करण्यात आले आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्विकृती शहरातील पीएमपीएमएलच्या आगारात करण्यात येणार आहे.
पासकेंद्र आणि नागरी सुविधा केंद्रात केवळ अर्जाचे वाटप केले जाणार ते आहे. शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज भरून दिल्यास सर्व पासेस शाळेत वितरीत केले जातील. खासगी शाळातील विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची २५ टक्के रक्कम चलनान्वये बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत पालिकेच्या खात्यावर भरावी.
त्यानंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या पीएमपीएलच्या आगारात सादर करावी. पास वितरण सोमवार (दि. १७) पासून केले जाणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मडिगेरी यांनी केले आहे.















