- आयुक्त म्हणतात ‘आपत्ती व्यवस्थापनाचा विभागनिहाय आराखडा’ तयार करणार..
- नागरिक म्हणतात, हे आधी का केलं नाही?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड शहराची दाणादाण उडाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचा विभागनिहाय आराखडा तयार करण्याची आठवण झाली आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये झालेल्या बैठकीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रम बगाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मात्र, शहरातील अनेक भाग जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवर तळी आणि खड्डे पडले, नागरिकांना भर पावसात आंदोलन करावे लागले. अशा स्थितीत आता भविष्यातील नियोजनाच्या घोषणा होत असल्याने नागरिक प्रशासनाला सवाल करत आहेत की, हे नियोजन आधी का झाले नाही? पूरग्रस्तांना अद्याप ठोस मदत जाहीर न झाल्याने संताप वाढत आहे.

















