- अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळल्याने २ ते ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच आणखी ८ ते १० कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

















