न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- देशाात डॉक्टरांवर पेशंटकडील नातेवाईकांकडून जीवघेणे हल्ले होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केला.
केंद्र सरकारने या संदर्भात कठोर उपाययोजना करून डॉक्टर व इस्पितळावर वारंवार होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदे करून गुन्हेगारांना कडक शासन करावे, या मागणीसाठी आयएमएच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉक्टरांच्या संघटनांनी काळ्या फिती बांधून,या घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ. सुहास माटे, पेटरन डॉ. दिलीप कामत, सचिव डॉ. सुधीर भालेराव, माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव दाते, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ. मनीषा गरुड, डॉ. दीपाली पाठक, त्याचबरोबर त्वचारोग तज्ञ, पॅथॉलॉजी विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, विविध मेडिकल कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.















