- पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जुलै २०२६) :- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने शुक्रवार (२४ जुलै) रोजी सकाळी ११.०० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा भक्ती-शक्ती चौक – भक्ती-शक्ती सर्कल – टिळक चौक – तहसीलदार कार्यालय, निगडी या मार्गाने जाणार असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यानुसार पोलिस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशानुसार २४ जुलै रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत निगडी वाहतूक विभागातील विविध मार्गांवर वाहतुकीस तात्पुरती मनाई करण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंद राहणारे मार्ग व पर्यायी मार्ग…
१) सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती सर्कल
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून भक्ती-शक्ती सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग :
सेंट्रल चौक – भक्ती-शक्ती ओव्हरब्रिज – सर्व्हिस रोड – पुणे दिशेकडे.
२) अंकुश चौक ते भक्ती-शक्ती सर्कल / टिळक चौक
अंकुश चौकातून भक्ती-शक्ती सर्कल व टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) मनाई.
पर्यायी मार्ग :
अंकुश चौक – भक्ती-शक्ती ग्रेड सेपरेटरखालून – भेळ चौक.
अंकुश चौक – ग्रेड सेपरेटरखालून – अप्पूघर चौक – मुकाई चौक.
३) अप्पूघर चौक ते भक्ती-शक्ती सर्कल
अप्पूघर चौकातून भक्ती-शक्ती सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई.
पर्यायी मार्ग :
अप्पूघर कॉर्नर – भक्ती रथ हार्डवेअर पंक्चरसमोरील ग्रेड सेपरेटर – अंकुश चौक.
अप्पूघर – ट्रान्सपोर्टनगरी – भक्ती रथ हार्डवेअर – पी.एम.पी.एम.एल. बसस्टॉप – मुंबई दिशेकडे.
४) दुर्गानगर चौक ते टिळक चौक
दुर्गानगर चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई.
पर्यायी मार्ग :
दुर्गानगर – चिकन चौक – अंकुश चौक – भक्ती-शक्ती ब्रिजखालून – अप्पूघर.
५) ख्वानंद डेअरी पंक्चर ते भेळ चौक / भक्ती-शक्ती चौक
या मार्गावरील वाहतुकीस मनाई.
पर्यायी मार्ग :
ख्वानंद डेअरी पंक्चर – टिळक चौकातून डावीकडे – खंडोबामाळ चौक.
६) खंडोबामाळ चौक (सेवा रस्ता) ते भक्ती-शक्ती सर्कल / सावली हॉटेल
सेवा रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना मनाई.
पर्यायी मार्ग :
खंडोबामाळ चौक – प्रेस्टीज प्लाझा – ग्रेड सेपरेटर – एस.बी.आय. पंक्चर – सेवा रस्ता – भक्ती-शक्ती सर्कल.
किंवा भक्ती-शक्ती ओव्हरब्रिजमार्गे सेंट्रल चौक.
७) बँक ऑफ महाराष्ट्र चौक (सद्भावना प्रतिष्ठान बसस्टॉप) ते सावली हॉटेल – टिळक चौक
या मार्गावरील वाहतूक बंद.
पर्यायी मार्ग :
बँक ऑफ महाराष्ट्र चौक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया – गांधी हॉस्पिटल चौक – काचघर चौक.
८) काचघर चौक ते टिळक चौक
काचघर चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई.
पर्यायी मार्ग :
गांधी हॉस्पिटल पंक्चर – काचघर चौक – भक्ती-शक्ती बसस्टॉप पुतळा – कृष्णा हॉटेल.
९) काचघर चौक ते भक्ती-शक्ती सर्कल
या मार्गावरही वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग :
काचघर चौक – भक्ती-शक्ती ब्रिजच्या डाव्या बाजूने – बसस्टॉप पुतळा – कृष्णा हॉटेल.
नागरिकांना आवाहन…
वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, २४ जुलै रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी वरील वाहतूक निर्बंध लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो मोर्चाच्या मार्गावरील परिसर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

















