न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे कामकाज सध्या महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या छोट्याशा कार्यालयातून सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी तीन जागांचा पर्याय समोर आला आहे.
त्यामध्ये चिंचवड येथील ऑटो क्लस्टरजवळील जागा, नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथील आणि खराळवाडीतील बालनगरीच्या जागेचा समावेश आहे. या तीनपैकी एका जागेवर स्मार्ट सिटीचे कार्यालय थाटण्याचे नियोजन आहे. संचालक मंडळाच्या बैठकित त्यावर चर्चा होऊन एका जागेला मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, तीन वर्षात स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून १९५.९२ कोटी आणि राज्य सरकारकडून ९७ कोटी असा एकूण २९२.९२ कोटींचा निधी मिळाला आहे.















