- अनुप मोरे सोशल अॅण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
- शेकडो रक्तदात्यांनी निभावली सामाजिक जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण येथील संजय काळे मैदानावर अनुप मोरे सोशल अॅण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
सकाळपासूनच रक्तदात्यांची नोंदणी सुरू झाली होती. युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही रक्तदानासाठी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान रक्तदात्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आयोजकांनी प्रत्येक रक्तदात्यास एका वर्षासाठी पाच लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती.
या उपक्रमामुळे रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज भागविण्यास मोठी मदत होणार असून, समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कामही या माध्यमातून झाले.
यावेळी भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे म्हणाले, “रक्तदान ही केवळ सेवा नसून ती एखाद्याला नवजीवन देण्याची संधी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असून, नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे म्हणाल्या, “रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करण्याची सवय लावली, तर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. या शिबिराला लाभलेला प्रतिसाद हा समाजातील सेवाभावी वृत्तीचा उत्तम नमुना आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याचे आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. रक्तदानासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांनी सन्मान करत त्यांचे आभार मानले. समाजहिताच्या अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्याने प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


















