न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- निगडीतील नामांकित शाळेत १४ वर्षीय पीडित मुलगा शिक्षण घेतो. त्याच शाळेत संबंधित आरोपी क्रीडा शिक्षक म्हणून नोकरी करत होता. जानेवारी २०१९ मध्ये त्याने पीडित मुलाला त्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.
तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास त्याच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, निगडी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.











