न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- एका इसमाने आठ वर्षांच्या चिमुरडीवर अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडित मुलीच्या घरासमोर भाड्याच्या खोलीत राहतो. ५ ते १५ जून या कालावधीत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत नेले. तिला त्याच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ दाखवले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
पीडित मुलगी शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत न गेल्याने शिक्षकांनी पालकांकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. एका सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना धीर देत गुन्हा नोंदवला. आरोपीने घटनेनंतर पळ काढला आहे.
व्यंकटेश स्वामी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या २६ वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.











