- तर, दिलीप आढेच्या विरोधात तातडीने विभागीय कारवाईचा ठराव…
- महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महापालिका सभागृह आक्रमक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ जुलै २०२६० :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला सुरक्षा आणि महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या घटनांवर जोरदार चर्चा झाली. विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणारे वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक डॉ. बालाजी लहू धायगुडे यांना सेवेतून कमी करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. विशाखा समितीच्या चौकशीत आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आल्याने समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली.
त्याचबरोबर जनगणना कर्तव्य बजावत असलेल्या महापालिकेच्या महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले अधिकारी दिलीप आढे यांच्याविरोधात तातडीने विभागीय कारवाई करण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या भूमिकेवर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे आणि शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनीही महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.


















