- ६१ वर्षीय नराधमाला पोलिसांकडून अटक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २८ जुलै २०२६० :- वाकड परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिच्या चार वर्षीय बहिणीलाही जबरदस्तीने घरात नेल्याचा आरोप असलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने आपल्या राहत्या घरी १० वर्षीय मुलीला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेच्या चार वर्षीय बहिणीलाही जबरदस्तीने घरात नेल्याची माहिती तक्रारदार महिलेला मिळाल्यानंतर त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे वाकड पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला मंगळवारी (२८ जुलै) पहाटे अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पीडित अल्पवयीन असल्याने तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.


















