- १५ टक्के पाणी कपात तातडीने रद्द करा – श्रीनिवास बिरादार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ जुलै २०२६० :- पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून रावेत बंधाऱ्यातूनही नियमित पाणीउपसा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरातील १५ टक्के पाणी कपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी श्रीनिवास तानाजी बिरादार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाणी कपातीमुळे अनेक भागांत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. स्मार्ट मीटर, स्काडा प्रणाली आणि नवीन जलवाहिन्यांची कामे होऊनही पाणी गळती व टँकरवरील अवलंबित्व कायम असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना कपात कायम ठेवण्याचे कारण नसल्याचे सांगत नियमित, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.


















