न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरीतील शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसानिमित्त पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
नगरसेविका अनुराधा गोफणे (सदस्य महिला व बाल कल्याण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) व सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


















