न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- अंगावर लघुशंका करताना रोखल्याने वृद्धावर कोयत्याने वार करण्यात आले. हा घृणास्पद प्रकार सोमवारी (दि. १७) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाकड येथे घडला. यामध्ये शिवमूर्ती जाकते (६५, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी मुलगा किरण जाकते (वय २३) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी उर्फ विकास अडागळे (रा. म्हातोबानगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी किरण यांचे वडील शिवमूर्ती यांना घरात उकडत असल्याने ते सोमवारी रात्री घरासमोर झोपले होते. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी अडागळे त्यांच्या अंगावर लघुशंका करू लागला.
त्यामुळे शिवमूर्ती खडबडून जागे झाले. त्यांनी अडागळे याला अंगावर लघुशंका करण्यास मनाई करीत जाब विचारला. त्याचा राग आल्याने अडागळे याने कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले. शिवमूर्ती यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा व पत्नी बाहेर आले. नागरिक जमा झाल्याचे पाहन अडागळेने तेथून पळ काढला.













