राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील आरोपांवर आमदार अमित गोरखे यांचे प्रत्युत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ अभ्यास करावा, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले. आंदोलनाच्या नावाखाली निराधार आरोप करून समाजात संभ्रम निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह अतुल लिमये यांनी सीजेपी आंदोलनाबाबत भूमिका मांडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना गोरखे बोलत होते.
गोरखे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षांत सामाजिक समरसता, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. महात्मा गांधी हत्या प्रकरणात संघावर आरोप झाले होते; मात्र न्यायव्यवस्थेने संघाला दोषमुक्त केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी संघाच्या कार्याचा प्रत्यक्ष परिचय घेतल्याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनात भारतविरोधी घोषणा व समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये झाल्याचा आरोप करत, आंदोलन हे लोकशाहीचे माध्यम असले तरी त्याचा वापर देशविरोधी विचारांना खतपाणी घालण्यासाठी होऊ नये, असे गोरखे यांनी नमूद केले. इतिहास, संविधान, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा अभ्यास करूनच सार्वजनिक वक्तव्य करावे, असे आवाहन त्यांनी अभिजीत दीपके यांना केले.
'' न्यूज पीसीएमसी '' हे पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारं संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन, आहे तशी बातमी वाचकांपर्यंत पोहोचविणे, हेच ''न्यूज पीसीएमसी''चे अंतीम ब्रीद आहे.
कृपया आपणांस काही सुचवायचे असलयास आपण [email protected] या ईमेलवरती आपल्या सूचना पाठवाव्यात. आपल्या सुचनांचा नक्कीच आम्ही स्विकार करू.
धन्यवाद.
संपादक....