न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. उच्चशिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळातच २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१% झाला आहे. यावरून भावनिक तसेच अस्मितेच्या मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या या मोदी सरकारने नवीन नोकऱ्या, उद्योग यांच्या वाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाही, असे लक्षात येते.
वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ५ वर्षात देशभरातील दोन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत (संदर्भ: एनएसओ सर्वेक्षण अहवाल) उच्चशिक्षित बेरोजगार युवांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. जिल्हा मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवस्थित माहिती दिली जात नाही. ऑनलाईन अर्ज किचकट पद्धतीचा आहे, रोजगार कार्ड काढून काही उपयोग नाही, नवीन उद्योजकांना कोणतेही सहकार्य मिळत नाही, फक्त कौशल्य विकास करून रोजगारच नसेल तर कार्यालय तरी कशासाठी चालू ठेवायचे?
याचा निषेध म्हणुन आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील एम्पॉलयमेंट ऑफीसला आज टाळे ठोकण्यात आले यावेळी. पुणे शहर अध्यक्ष राकेश कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, प्रदेश सरचिणीस अभिषेक बोके, प्रदेश संघटक विशाल काळभोर, प्रदेश सरचिणीस लाला चिंचवडे, प्रदेश सरचिणीस समीर चांदेरे, प्रदेश सरचिणीस अजय आवटे, ज़िल्हा अध्यक्ष सातार तेजस शिंदे, मनोज पाचपुते, किशोर कांबळे, अमोल ननावरे, विशाल नाटेकर, महेश हांडे, अच्युत लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.













