न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- सोमनाथ याने अल्पवयीन पीडित मुलीला हाताने, बुक्क्याने मारहाण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केला. या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलीने हा प्रकार घरी सांगत प्रकरणाला वाचा फोडली. ही घटना १० ते १५ जून या कालावधीत निगडी येथे घडली. याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमनाथ रुपचंद थोरात (वय ३५) असे अटक केलेल्या नराधमाच्या नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.













