न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- वटपौर्णिमा सणानिमित्त अनेक महिला भगिनी वडाच्या झाडाची पूजा करून त्याला धागे गुंडाळतात. ते धागे न काढल्याने झाडांची वाढ खुटते. हे टाळण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पालिकेच्या मदतीने शहरातील सुमारे ४० वडांच्या झाडांवरील दोर काढून त्यांना मुक्त केले.
अंघोळीच्या गोळी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महापालिकेचा आरोग्य विभाग चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघ, सहगामी ग्रुप यांच्या सहकार्याने मंगळवारी (दि. १८) रोजी चिंचवडगाव, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, निगडी, प्राधिकरण परिसरातील सुमारे ४० वडाची झाडे दोरेमुक्त करण्यात आली.
यावेळी आरोग्य निरीक्षक भूषण शिंदे आणि सहकारी, चिंतामणी जेष्ठ नागरिक संघाचे बाळासाहेब वाल्हेकर, सदस्य, अंघोळीच्या गोळीचे सचिन काळभोर, आनंद पानसे, प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, राहल धनवे, संदीप सपकाळ, देवजी सप्रिया व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.















