न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- दत्तात्रय १ ते ७ मे या कालावधीत गावी गेले होते. या दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधून १६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सात मे रोजी दत्तात्रय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. ही घटना ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर येथे घडली. दत्तात्रय भगवान चिंचवडे (वय ३९, रा. ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











