न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- फिर्यादी महिलेचे आरोपी पतीशी २०१० साली लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी महिलेला संगनमत करून मारहाण व शिवीगाळ करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पिंपरीत राहणाऱ्या पतीने फिर्यादी महिलेला अश्लील व्हिडियो दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
तसेच पतीने त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला देखील अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार कला. याप्रकरणी ३६ वर्षीय पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासू आणि दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.











