- वृद्ध महिलेच्या वडिलांना अटक करण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पोलिस असल्याचे भासवून वृद्ध महिलेच्या वडिलांना अटक करण्याची धमकी देत तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड येथील क्विन्स टाउन सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये एक अनोळखी व्यक्ती तसेच आयसीआयसीआय आणि सिटी युनियन बँकेतील खातेदारांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना पोलिस असल्याचे भासवले. त्यांच्या विरोधात कारवाई झाल्याचे सांगत अटक करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून फिर्यादीकडून पैसे उकळण्यात आले.
आरोपींनी आरटीजीएसच्या माध्यमातून एकूण २१ लाख रुपये वळते करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे.


















