न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- भरधाव वेगाने टँकर चालवून दुचाकीला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात घडली. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिलसिंग प्रविणसिंग सिसोदिया (वय २२, रा. श्रीराम कॉलनी, दत्तनगर, दिघी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुणावळे गावठाण शाखेजवळ हा अपघात झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महादेव रमाकांत किडे (वय ३५) हा टाटा कंपनीचा १० टायरचा पाण्याचा टँकर चालवत होता. त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत निखिलसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेत पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


















