न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय व पतंजलि योग समिती, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन – २०१९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी महापौर राहुल जाधव समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक रवि लांडगे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे व आदी मान्यवरांनी या योग शिबिराचा लाभ घेतला.















