न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी घोडे यांच्या हस्ते शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून केले.
यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी उपस्थित होते.
योगाशिक्षक अर्चना सोनार, दर्शना शेट्टी, माधुरी पाटील, सुप्रिया देसाई, शिल्पा गाडेकर यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवले तर सोनार यांनी योगाचे महत्व सांगितले.
यावेळी योगा प्रशिक्षक सोनार यांनी वृक्षासन, भुजंगासन, चक्रासन, झूलासन, कपालभातीचे योगासने करून दाखवत त्यांचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी तर आभार विकास म्हस्के यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज कांबळे, देवेंद्र पाटील, दिनकर रनवरे, रूपाली पवार, सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, सुवर्णा आरोटे, दैवशाला चोले, पूनम सुरवसे, क्रिडा शिक्षक संतोष घरडे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रमोद रायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


















