न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यीनींच्या सोयीसाठी भोसरी येथे मोफत वस्तीगृह सुरु केले आहे. तेथे निवास व भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी याकरीता शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातूनच नुकतीच शासनाने या योजनेची घोषणा केली. त्यामुळे गरजू विद्यार्थिनीनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शासकीय मुलींचे वस्तीगृह, स्पाईन रोड, संतनगर, सेक्टर ४, केंद्रीय विहिर मागे, भोसरी-मोशी प्राधिकरण येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महेशदादा जनसेवा विचारपीठ आणि म. प्र. भाजपा (का.आ.) सचिव हनुमंत लांडगे यांनी केले आहे.















