शिवसेना भोसरी विधानसभा, महाराष्ट्र मजदूर संघटना व भारतीय कामगार सेना महासंघाचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना भोसरी विधानसभा तसेच महाराष्ट्र मजदूर संघटना व भारतीय कामगार सेना महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने इयता १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि करियर मार्गदर्शन सोहळा उद्या शनिवार (दि. २२) रोजी सायंकाळी ५.०० वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल खा. श्रीरंग बारणे व शिरूरचे मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या भव्य सत्काराचे आयोजनही करण्यात आले आहे.
या समारंभास भोसरी मतदारसंघातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात नवनियुक्त शिवसेना उपनेते व मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद, जिल्हा संघटिका महिला आघाडी सुलभाताई उबाळे, पिपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी चिंचवड शहर संघटिका उर्मिला काळभोर, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व मतदारसंघातील नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सोहळ्याचे आयोजक शिवसेना भोसरी विधानसभा, महाराष्ट्र मजदूर संघटना, भारतीय कामगार सेना महासंघ व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख महादेव गव्हाण यांनी केले आहे.















