- नगरसेवक शैलेश मोरे व स्वयंसिद्धा संस्था एम्पायर इस्टेट आयोजित योग शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- जागतिक योग दिनाचे औचित्य साधत चिंचवड येथे नगरसेवक शैलेश मोरे व स्वयंसिद्धा संस्था एम्पायर इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने एम्पायर इस्टेट सोसायटीच्या क्लब हाऊस नं. १ मध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. विकास चोथे व डॉ. श्वेतांबरी चोथे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सोसायटीच्या सदस्यांनी विविध प्रकारचे योगासनं केली. तसेच त्यांना विविध प्रकारच्या योगासनांचे महत्वही तज्ञांनी पटवून दिले.

नगरसेवक शैलेश मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सध्याच्या धावत्या युगात आरोग्याची निगा राखायची असेल तर, नियमित योगासनं केली पाहिजेत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या सुटण्यास मदतच होईल. आज जागतिक पातळीवर व देशभरात यशस्वी व्यक्तींच्या मागे योगासनांची मोठी ताकद आहे. त्यामुळे नित्य व सातत्याने योगासनं केली तर, दुर्धर आजार तर, मिटतीलच परंतु, आयुष्यही सकारात्मकरित्या जगण्याकरीताचा एक नवा राजमार्गही सापडेल.
या शिबिरात सोसायटीतील सदस्य, स्थानिक महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.















