- अधिकाऱ्यांमध्ये ‘नो टेन्शन’ वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी सध्या काहीसे रिलॅक्स मूडमध्ये असल्याचे चित्र आहे.
विविध विभागांमध्ये नियमित प्रशासकीय कामकाज सुरू असले तरी नवीन निर्णय, विकासकामे आणि काही महत्त्वाच्या प्रक्रियांवर आचारसंहितेचा परिणाम होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण तुलनेने कमी झाल्याचे बोलले जात आहे.
“गेल्या काही महिन्यापासून कामाचा मोठा लोड होता. आता महिनाभर काहीसा कामाचा ताण कमी असल्याने वातावरण शांत झाले आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित कामे पुन्हा वेगाने सुरू होतील आणि कामाचा लोड वाढणार,” अशी प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केली.

















