- गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक गुरुवारी उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततेत पार पडली. ढोल-ताशा, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि डीजेच्या गजरात गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महापालिकेच्या वतीने बापूजी बुवा चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथे मंडळांच्या अध्यक्षांचा अतुल पाटील, किरण गायकवाड आणि किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पहिली मिरवणूक वीर हनुमान मित्र मंडळाने, तर शेवटची विघ्नहर्ता मित्र मंडळाने काढली.
मिरवणुकीत वीर हनुमान मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य तरुण मित्र मंडळ अँड ट्रस्ट, फुगे माने तालीम मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ, कै. दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, नरवीर तानाजी मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, मधले फुगे तालीम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गव्हाणे तालीम मित्र मंडळ, भगवान गव्हाणे मित्र मंडळ, विनर्स मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ, भोलेश्वर मित्र मंडळ, युवा सारथी मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ सहभागी झाले.
महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा, सीआरपीएफ जवान, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मिरवणूक सुरळीत पार पडली.


















