- पारंपरिक नृत्य सादरीकरणात घेतला सहभाग..
- ४६ वर्षांपासून जपलेल्या गणेश प्रतिष्ठापनेच्या परंपरेचे केले कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- आमदार शंकर जगताप यांनी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात आयोजित गणेशोत्सवात सहभागी होत श्रीगणेशाची आरती केली आणि गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना जगताप यांनी ज्ञान प्रबोधिनीमध्ये गेल्या ४६ वर्षांपासून जपली जात असलेली गणेश प्रतिष्ठापनेची परंपरा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ज्ञान प्रबोधिनी ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि शास्त्रोक्त पूजेची ओळख करून देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे केंद्राचे पदाधिकारी तसेच भाविक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गणेशभक्तांनी सादर केलेल्या सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमातही आमदार शंकर जगताप सहभागी झाले. त्यांनी भक्तांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संस्कार, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव ठरतो, असे जगताप यांनी नमूद केले. ज्ञान प्रबोधिनी परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात असल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


















