न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने उद्या, रविवार (दि. २७ सप्टेंबर) पिंपरी येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दुपारी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत असल्याचे शिवसेनेने सांगितले आहे.
या आंदोलनास शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या, युवा सेना तसेच आजी-माजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी केले आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात निषेध नोंदविण्यात येणार असून, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

















