न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- रावेत येथील न्यू बीआरटी रोडवरील अप्पुघरजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या बुलेटने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुलेटचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अप्पुघरजवळील बसस्टॉपच्या शेजारी घडली. चिंन्मय महेश बरीदे (वय २०, रा. बाणेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिंन्मय बरीदे हा बुलेट भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने पुढे चाललेल्या च्या ऑटो रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाली. अपघातात रिक्षाचालक अनिल तांबे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच रिक्षाचेही नुकसान झाले. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















