न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- वाकड गावठाणातील स्मशानभूमीजवळ एमडी (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाचे सेवन करताना एका १९ वर्षीय तरुणाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्कर्ष आकाश जाधव (वय १९, रा. वाकड) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास वाकड गावठाणातील स्मशानभूमीजवळ ही कारवाई करण्यात आली. उत्कर्ष हा एमडी (मॅफेड्रॉन) या मादक पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी त्याला नोटीस बजावली आहे.


















